महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; प्रतिसेकंद 80 घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ ते 10 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातील पाण्याचा साठाही वाढला आहे.आज बेंबळा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पाचे दोन दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले. सध्या धरणातून प्रतिसेकंद 80 घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

Bembala Dam
बेंबळा धरण

By

Published : Jul 17, 2020, 8:16 PM IST

यवतमाळ -जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ ते 10 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नाले आणि छोट्या नद्या दुथडी भरून वाहत आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पातही पाण्याची मोठी साठवण झाली आहे.

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले

सध्यस्थितीत बेंबळा धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 85 टक्के पाणीसाठा झाल्याने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याचा विसर्ग करण्याबाबत बेंबळा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आज बेंबळा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पाचे दोन दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले. सध्या धरणातून प्रतिसेकंद 80 घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होते असल्याने बाभुळगाव कळम या तालुक्यातील नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील इतर लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. निळोणा धरण भरल्यामुळे यवतमाळकरांना येत्या उन्हाळ्यासाठी दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वीच राळेगाव तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आले. पूराचे पाणी ऐकुर्ली व आस्टोना गावात शिरल्याने घरांचे आणि शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूणच आत्तापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details