महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्याला दोन जिल्हाधिकारी? प्रशासनाचा गोंधळ की जाणून बुजून नियुक्ती

राज्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या. अवर सचिव सुभाष इंगळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात यवतमाळ जिल्ह्याला दोन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

yavatmal collector
यवतमाळ जिल्ह्याला दोन जिल्हाधिकारी? प्रशासनाचा गोंधळ की जाणून बुजून नियुक्ती

By

Published : Feb 20, 2020, 3:59 PM IST

यवतमाळ -ठाकरे सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकाडून प्रसिद्ध केलेल्या एका पत्राने यवतमाळमध्ये गोंधळ उडाला आहे. राज्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. या प्रशासकीय बदल्या झाल्याचे पत्र अवर सचिव सुभाष इंगळे यांच्या 18 फेब्रुवारी 2020 च्या पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात यवतमाळ जिल्ह्याला मात्र, दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा समावेश केला आहे.

यवतमाळ जिल्ह्याला दोन जिल्हाधिकारी? प्रशासनाचा गोंधळ की जाणून बुजून नियुक्ती

हेही वाचा -

केंद्र सरकारकडून दुग्धोत्पादन क्षेत्राकरिता ४,५५८ कोटी रुपयांची योजना मंजूर

21 अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये 13 क्रमांकावर लातूर महानगरपालिचे आयुक्त एम. देवेंद्रर सिंग (2011 बॅच) यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली झाली असे सांगितले. तर याच यादीतील 16 क्रमांकावर असलेले आर. बी. भोसले (2008 बॅच) यांची सुद्धा यवतमाळ जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यामुळे हे पत्र हाती आल्यामुळे नेमका गोंधळ उडाला आहे. असे असले तरी

यवतमाळ जिल्ह्याला दोन जिल्हाधिकारी? प्रशासनाचा गोंधळ की जाणून बुजून नियुक्ती
एम. देवेंद्रर सिंग यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी पदाचा पदभार तीन दिवसांपूर्वी स्वीकारला आहे. त्यांच्या अगोदर यवतमाळ येथे अजय गुल्हाने हे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागेवर या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

पत्रामध्ये दोन अधिकारी एकाच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून दाखवण्यात आल्याने यामध्ये गोंधळ कसा झाला हा प्रश्न विचारण्यात येत आहे. आता यवतमाळला दोन जिल्हाधिकारी कार्यालय राहणार की अनावधानाने ही चूक झाली. याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा -

'26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची फेरचौकशीची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा'

ABOUT THE AUTHOR

...view details