यवतमाळ - जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील नेर येथे १६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने आज केली. अन्न व औषधी प्रशासन विभागाला नेरमधील एका घरामध्ये गुटख्याची साठवणूक असल्याची गुप्त माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस प्रशासन आणि औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाई केली.
यवतमाळ : नेर येथे १६ लाखांचा गुटखा जप्त - ner
जप्त केलेल्या या साठ्यातून काही नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर उर्वरीत साठा आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने त्याचा पुनर्वापर होऊ नये म्हणून जप्त करून कार्यालयात आणून ठेवले आहे. तसेच सदर साठा केलेले गोदाम साठवणूक व विक्रीसाठी पुनर्वापर होऊ नये म्हणून पुढील आदेश मिळेपर्यंत सील करण्यात आले आहे.
मोहम्मद सलीम पीर मोहम्मद यांच्या राहत्या घरी पथकाने धाड टाकली. यामध्ये घरामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ, जिंदगी रॉयलु चॉईस या ब्रँडचा एकूण १६ लाख ६३ हजार २०० रूपये किमतीचे १३ हजार ८६० रूपयांची गुटख्यांच्या पाकीटांचा साठा आढळून आला.
जप्त केलेल्या या साठ्यातून काही नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर उर्वरीत साठा आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने त्याचा पुनर्वापर होऊ नये म्हणून जप्त करून कार्यालयात आणून ठेवले आहे. तसेच सदर साठा केलेले गोदाम साठवणूक व विक्रीसाठी पुनर्वापर होऊ नये म्हणून पुढील आदेश मिळेपर्यंत सील करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध नेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.