यवतमाळ - राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली येथे कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज 10 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तीन सख्ख्या बहिणींचा एकाच वेळी करूण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कुलरचा शॉक लागून 3 चिमुकल्या बहिणींचा मृत्यू
राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली येथे कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज 10 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तीन सख्ख्या बहिणींचा एकाच वेळी करूण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कु.रिया गजानन भूस्सेवार (9 वर्ष) कु. संचिता भूस्सेवार (7वर्ष), मोनीका गजानन भूस्सेवार (5 वर्ष) अशी मृतक बहिणींची नावे आहेत. आई निंदणाच्या कामासाठी व वडील फवारणीच्या कामसाठी शेतात गेले होते. तिन्ही बहिणी या घरी होत्या. दरम्यान, तिघी जेवण करण्यासाठी एकत्र बसल्या. जेवताना कुलर लावण्याकरिता मुलगी रिया गेली असता तिला कुलरचा शॉक लागला. मोठ्या बहिणीला वाचवण्याकरिता संचिता व मोनीका गेल्याने त्यांचाही विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना घराशेजारी असलेल्या वृध्द महिलेल्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत तिन्ही मुलींचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा- वॉचमनच्या मुलीचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; भांडुपमधील भाग्यश्रीवर कौतुकाचा वर्षाव