महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडीचे सरकारच हीच मिस्टेक- माजी ऊर्जा राज्यमंत्री येरावार

राज्यात आलेले महाविकास आघाडी सरकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहे. राज्यातील 11 कोटी जनतेचे कुठलेच घेणेदेणे नाही. भाजप सरकारच्या काळात साडेसात लाख नवीन वीज कनेक्शन देण्यात आले. मात्र हे सरकार थकीत वसुली पोटी नागरिकांचे वीज बंद करण्यासाठी निघाले आहे.

महाविकास आघाडीचे सरकारच हीच मिस्टेक
महाविकास आघाडीचे सरकारच हीच मिस्टेक

By

Published : Feb 5, 2021, 8:09 PM IST

यवतमाळ - राज्यात आलेले महाविकास आघाडी सरकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहे. राज्यातील 11 कोटी जनतेचे कुठलेच घेणेदेणे नाही. भाजप सरकारच्या काळात साडेसात लाख नवीन वीज कनेक्शन देण्यात आले. मात्र हे सरकार थकीत वसुली पोटी नागरिकांचे वीज बंद करण्यासाठी निघाले आहे. त्यामुळे आज भाजपच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर टाळा ठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडीचे सरकारच हीच मिस्टेक
मंत्र्यांमध्येच ताळमेळ नाही2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शासनाने मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जाहीरनाम्यात प्रिंट मिस्टेक असल्याचे जाहीर केले. मात्र, लॉकडाउन काळात 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची घोषणाही केली होती. आता ही कुठली मिस्टेक होती, असा आरोपही माजी ऊर्जामंत्री मदन येरावार यांनी केला. ज्या ठिकाणी वीज कापण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जातील त्या ठिकाणी भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी देखील झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details