महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीच्या हिस्सेवाटणीतील वादातून मुलाने केली बापाची हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी येथील खापरी या गावांमध्ये शेतीच्या हिस्सेवाटणीसाठी झालेल्या वादातून मुलाने बापाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

यवतमाळमध्ये मुलाने केली बापाची हत्या

By

Published : Jul 25, 2019, 8:31 PM IST

यवतमाळ - झरीजामनी तालुक्यामधील खापरी येथे मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. काही दिवसापासून शेतीच्या हिस्सेवाटणी वरून घरामध्ये वाद सुरू होता. या वादातूनच मुलाने वडिलांची हत्या केली आहे.

यवतमाळमध्ये मुलाने केली बापाची हत्या

विकृत पद्धतीने नामदेव दोन तास वडिलांच्या डोक्यावर वार करीत राहिला

खापरी या गावांमध्ये वडील दत्तू उरवते (६७) आणि मुलगा नामदेव उरवते यांनी नेहमीप्रमाणे रात्री एकत्र जेवण केले. वडील व आई हे आपल्या खोलीमध्ये झोपी गेले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा नामदेव उरवते (३५) याने वडिलांच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र विकृत पद्धतीने नामदेव दोन तास वडिलांच्या डोक्यावर वार करीत राहिला. पहाटे या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली. गावातील पोलीस पाटलांनी तातडीने पाटण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून गावात घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी घटनास्थळ गाठून आरोपी नामदेव उरवते याला अटक केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरीजामनी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details