यवतमाळ - जिल्ह्यातील चापर्डा गावाजवळ शिवशाही बस आणि मालवाहू 407 मेटॅडोरचा अपघात झाला आहे. यात मेटॅडोर चालक जागीच ठार झाला असून शंकर अलट असे त्याचे नाव आहे. या घटनेत बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
यवतमाळमध्ये शिवशाही बस-मेटॅडोरची टक्कर; ट्रकचालक ठार
यवतमाळमधून नागपूरला जाणारी शिवशाही बस आणि (एमएच-29,बीइ-1064) कळंबकडून यवतमाळकडे येणार्या मेटॅडोरची (एमएच-24, जे 6063) समोरासमोर धडक झाली.
हेही वाचा -चौपदरीकरनाच्या खोदलेल्या जागेत फसली बस; कोणतीही जीवितहानी नाही
यवतमाळमधून नागपूरला जाणारी शिवशाही बस आणि (एमएच-29,बीइ-1064) कळंबकडून यवतमाळकडे येणार्या मेटॅडोरची (एमएच-24, जे 6063) समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की शिवशाही बस महामार्गावरील बाजूच्या डिवाइडरवर जाऊन चढली. तर मेटॅडोरची संपूर्ण केबिन जाम होऊन चालक स्टेरिंगमध्ये फसला. अपघातात मेटॅडोर चालक जागीच ठार झाला. तर शिवशाही बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींवर कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.