महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोळ्याचे पारणे फेडणारा सहस्त्रकुंड धबधबा पडला कोरडा

पावसाळी पर्यटनाला समृद्ध करणारा पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओस पडलेला आहे. लवकरच दमदार पावसाला सुरुवात होईल आणि हा सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा नव्याने आपल्या सहस्त्र धारेने फुलून निघेल, अशी आशा पर्यटकांना लागली आहे.

By

Published : Jul 14, 2019, 4:27 PM IST

सहस्त्रकुंड धबधबा

यवतमाळ- जुलै महिन्याचा पंधरवडा लोटला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला पैनगंगा नदीवरील धोधो कोसळणारा सहस्त्रकुंड धबधबा अद्यापही कोरडा पडलेला आहे.

सहस्त्रकुंड धबधबा

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असणाऱ्या धबधब्याचा अलीकडचा भाग यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात येतो. तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यात येतो. हा धबधबा उमरखेड पासून 70 किलोमीटर तर यवतमाळपासून 181 किलोमीटर अंतरावर आहे.

पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे डोळयाचे पारणे फेडणारा आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.

सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर पर्यटकांसाठी बगीचा तयार करण्यात आला आहे. धबधब्याच्या तुषारात मनसोक्त भिजल्यानंतर या बगीच्यात विश्रांती करत धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा पर्यटकांचा आनंद काही औरच असतो. धबधब्याच्या काठावर असलेले पंचमुखी महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दोन दिवसांच्या पावसाळी पर्यटनात सहस्रकुंड धबधबा परिसरात पक्षी आणि वन्य प्राण्यांचे वैविध्य पहावयास मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details