महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सध्या शेतात गहू, हरभरा, फळबाग, भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणी गहू व हरबरा काढण्याचे काम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे हे पीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका
अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

By

Published : Mar 22, 2021, 1:18 PM IST

Updated : Mar 22, 2021, 2:57 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, महागाव तालुक्यासह शहरी भागात रात्री वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडून गेले आहेत. तर हरबरा, गहू, संत्रा, तसेच आंबाचा मोहर व आंबा जमीनवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका


शेतकऱ्यांची मदतीची मागणी
अगोदरच आस्मानी संकटाने त्रस्त असलेला शेतकरी वर्ग निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे. दिग्रस तालुक्यातील इसापूर शिवारातील शेताच्या बांधावरील मोठी झाडे वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उन्मळून पडली आहे. परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर आता अवकाळी रब्बी पिके येण्याआधी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


गहू, हरबरा पिकाचे नुकसान
सध्या शेतात गहू, हरभरा, फळबाग, भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणी गहू व हरबरा काढण्याचे काम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे हे पीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

हेही वाचा-बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन, प्राणीमित्राकडून कारवाईची मागणी

Last Updated : Mar 22, 2021, 2:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details