महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! बियाणे तस्कराकडून यवतमाळच्या युवा शेतकऱ्याचा घातपात?

बीजी बियाण्यावर बंदी असल्याने आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील कपाशी बियाणे विकणारे गुन्हेगारी प्रवृतीचे दलाल राज्यात सक्रिय झाले आहे. विविध आमिष दाखवून शेतकऱ्यांना लुबाडन्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. आता तर शेतकऱ्यांच्या जिवावर हे तस्कर उठल्याचे दिसून येत आहे.

By

Published : Jun 3, 2019, 4:44 PM IST

मृत अमित इंगोले

यवतमाळ- पिंपरी येथील प्रगतशील युवा शेतकरी अमित इंगोले याचा आदिलाबाद येथे मृत्यू झाल्याची घटना घडली. आदिलाबाद येथील बीजी कपाशी बियाणांच्या तस्कराने त्याला बोलावले होते. साठ हजार रुपये घेऊन अमित आदिलाबादकडे त्याच दिवशी रवाना झाला. मात्र, तो जिवंत गावी पोहोचलाच नाही. अमितचे भाऊ आशिष इंगोले यांना अमितचा मृत्यूपूर्वी शेवटचा कॉल आला. 'कोल्ड्रींकमधून विष देण्यात आले, माझ्या तोंडाला फेस येत आहे', हे त्यांचे शेवटचे शब्द होते.

मृत अमित इंगोले यांचे बंधू आशिष इंगोले

आशिष इंगोले यांनी याबाबत राळेगाव व आदिलाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणात घातपात असण्याची दाट शक्यता आहे. या बियाण्यावर बंदी असल्याने आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील कपाशी बियाणे विकणारे गुन्हेगारी प्रवृतीचे दलाल राज्यात सक्रिय झाले आहेत. विविध आमिष दाखवून शेतकऱ्यांना लुबाडन्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. आता तर शेतकऱ्यांच्या जिवावर हे तस्कर उठल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सीमेलगत असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्याततून बंदी असलेले बीजी बियाणे मोठ्या प्रमाणात वणी, मारेगाव, झारीजामनी, वडकी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना छुप्या मार्गाने अल्प दरात विक्री करण्यात येते. कमी दरात कपाशीचे बियाणे मिळत असल्याने शेतकरीही ते खरेदी करतात. हे बियाने या भागात विक्री होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. कृषी विभागाकडून यावर कारवाई करण्यात आली. मात्र, ठोस उपाययोजना न करण्यात आल्याने बीजी बियाणे विक्रीचा गोरखधंदा खुलेआमपणे सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details