महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांना निवडणूक आयोगाविरोधात बोलणे पडले महाग, गुन्हा दाखल

प्रकाश आंबेडकरांविरोधात यवतमाळमधील दिग्रजमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकरांनी दिग्रजच्या प्रचारसभेत सत्तेत आल्यानंतर निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By

Published : Apr 4, 2019, 10:52 PM IST

Updated : Apr 5, 2019, 3:08 AM IST

प्रकाश आंबेडकर

यवतमाळ - सत्तेत आल्यानंतर निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी आज दिग्रसमधील प्रचारसभेत केले होते. त्यामुळे दिग्रस पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर

दिग्रस येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्राध्यापक प्रविण पवार यांच्या प्रचारात आंबेडकरांनी निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या टीममधील विवेक जोशी यांच्या तक्रारी नंतर आंबेडकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते आंबेडकर

निवडणूक आयोग यंत्रणा ही भाजपच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना जेलची हवा खायला पाठवू, असे ते म्हणाले होते. दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

Last Updated : Apr 5, 2019, 3:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details