महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फुलांना फेकताना डोळे भरून येतात; उदरनिर्वाह करायचा तरी कसा? शेतकऱ्यांवर घोंगावतेय आर्थिक संकट

शेतकऱ्यांनी फुलाच्या वाढत्या मागणीमुळे गुलाब, गलांडा, मोगरा, चमेली, जलबेरा, लिली, झेंडू, अशा अनेक प्रकारच्या फुलांची लागवड केली. हंगामात या फुलांचे दर दोनशे ते 300 रुपयांपर्यंत असतात. परंतु, कोरोनामुळे रहदारी पूर्णपणे बंद झाल्याने बाजारही बंद झाला आहे. त्यामुळे जी फूले विकण्यासारखे आहेत ते फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

By

Published : Apr 6, 2020, 3:17 PM IST

फुलांना फेकताना डोळे भरून येतात; उदरनिर्वाह करायचा तरी कसा? शेतकऱ्यांसमोर घोंगावतेय आर्थिक संकट

यवतमाळ -ज्या फुलांना आपल्या लहान मुलांप्रमाणे काळजी घेतली. ज्या फुलांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. आज तीच फुल शेतातील खतांच्या ढिगाऱ्यावर टाकण्याची वेळ जिल्ह्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. फुल लागवड करणारे शेतकरी दररोज हजारो रुपये किमतीची फुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

यवतमाळ जिल्हाचे कापूस, सोयाबीन, तूर या नगदी पिकांची लागवड केली जाते. परंतु, काही वर्षांपासून निसर्गचक्र फिरत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नवीन पिके लावण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील पुसद, आर्णी, बाभुळगाव, कळंब, पांढरकवडा आणि यवतमाळ, मारेगाव, महागाव, घाटंजी, उमरखेड तालुक्यात जवळपास ३५० एकरावर फुल शेतीची लागवड करण्यास सुरुवात केली. या पिकावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून होते.

फुलांना फेकताना डोळे भरून येतात; उदरनिर्वाह करायचा तरी कसा? शेतकऱ्यांसमोर घोंगावतेय आर्थिक संकट

शेतकऱ्यांनी फुलाच्या वाढत्या मागणीमुळे गुलाब, गलांडा, मोगरा, चमेली, जलबेरा, लिली, झेंडू, अशा अनेक प्रकारच्या फुलांची लागवड केली. हंगामात या फुलांचे दर दोनशे ते 300 रुपयांपर्यंत असतात. परंतु, कोरोनामुळे रहदारी पूर्णपणे बंद झाल्याने बाजारही बंद झाला आहे. त्यामुळे जी फूले विकण्यासारखे आहेत ते फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ही फुले आता शेतकऱ्यांना दररोज खतांच्या ढिगाऱ्यावर टाकावे लागत आहे. त्यामुळे दररोज ३ ते ४ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details