महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू; पुसद येथील घटना

अनेकजण मुंबई व पुण्यावरून गावाकडे परतले आहेत. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बोरगडी रोडवर ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळला त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला आहे. तो चार दिवसापूर्वी नारायणगाव वरून आलेला होता.

By

Published : May 20, 2020, 3:19 PM IST

home quarantine person died
होम क्वावरंटाइन व्यक्तीचा मृत्यू

यवतमाळ- पुसदपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलमूर्ती नगरातील बोरगडी रोडवर होम क्वारंटाइन असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी सांयकाळी पाच वाजताच्या दरम्यान आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव गौतम जळबा कांबळे (52) तो हुडी जवळील येहळा येथे शेतात राहत होता.

सोमवारी पुसदमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यामुळे येथे व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. अनेकजण मुंबई व पुण्यावरून गावाकडे परतले आहेत. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बोरगडी रोडवर ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळला त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला आहे. तो चार दिवसापूर्वी नारायणगाव वरून आलेला होता. त्याच्या पत्नीसह तो चालत वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी दोन वाजता एसटी बस स्थानकावरील तपासणी केंद्रात आलेला होता.

भर उन्हात पत्नीसह चालत निघाला असता, खाली कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तहसीलदार वैशाखात वाहुरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार व शहर ठाणेदार प्रमेश आत्राम घटनास्थळी पोहोचले. कांबळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details