महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एक एक उमेदवार विजयी

राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहिर झाला आहे. या निवडणुकीत जनतेने कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. १०५ जागा मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५४ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचाराचा झंझावात या निवडणुकीत पहायला मिळाला.

By

Published : Oct 27, 2019, 4:04 PM IST

यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एक एक उमेदवार विजयी

यवतमाळ - राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहिर झाला आहे. या निवडणुकीत जनतेने कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. १०५ जागा मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५४ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचाराचा झंझावात या निवडणुकीत पहायला मिळाला. ५४ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस ही तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. जिल्ह्यातील सात मतदारसंघासात भाजपने पाच जागी विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला आपला गड राखण्यात यश आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एक एक उमेदवार विजयी

हेही वाचा -देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

सर्वाधिक अटीतटीची लढत यवतमाळ मतदार संघात झाली. पालकमंत्री मदन येरावार यांनी अखेरच्या टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांचा जवळपास २१५० मतांनी पराभव केला. राळेगावमधून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांचा १०१४१ मतांनी पराभव केला. दिग्रसमधून शिवसेनेचे उमेदवार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार संजय देशमुख यांचा ६३ हजार ६३० मतांनी पराभव करून विजयी चौकार मारला.

हेही वाचा -विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला

पुसदमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंद्रनील नाईक यांनी त्यांचे चुलत बंधू भाजप उमेदवार अ‌ॅड. निलय नाईक यांचा ९ हजार ७०१ मतांनी पराभव केला. उमरखेड येथे भाजपचे नामदेव ससाणे यांनी काँग्रेसच्या विजय खडसे यांचा ९ हजार ४२७ मतांनी पराभव केला. वणी येथे भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार हे २५ हजार मतांनी विजयी झाले आहे. आर्णी येथे भाजपचे संदीप धुर्वे यांना ८१ हजार २९८ मते मिळाली. तर काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ८९ मते मिळाली. या मतदारसंघात धुर्वे साडेतीन हजार मतांनी विजयी झाले.

हेही वाचा -सरकार युतीचेच होणार..! फडणवीसांनी दिले मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी आमंत्रण

संजय राठोड यांना एक लाख ३६ हजार ८२४ मते घेतली. भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांना ७३ हजार २१७ मते मिळाली. तब्बल ६३ हजार ६०७ मतांनी आघाडी घेत संजय राठोड चौथ्यांदा विजयी झाले. उर्वरित उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे मो. तारीक मो. समी यांना ६ हजार २०५ मते मिळाली, वंचित बहुजन आघाडीचे शेहजाद समिउल्ला खान यांनी ३ हजार ७७ मते घेतली. बसपाचे एजाज नवाज खान यांना ९५९ मते मिळाली. बळीराजा पार्टीचे देवराव मासाळ यांना १ हजार ८११, बहुजन मुक्ती पार्टीचे बिमोद मुदाने यांनी ८७५ मते घेतली. अपक्ष उमेदवार भीमराव पाटील यांनी ५८६ मते घेतली. नंदकिशोर ठाकरे यांना ७४३मते तर आशिष देशमुख यांनी ३७६ मते घेतली. निवडणूकीचा निकाल घोषित होताच संजय राठोड समर्थकांनी एकच जल्लोष केला.

ABOUT THE AUTHOR

...view details