यवतमाळ - जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात येणार होती. आठ हजार 141 सदस्य निवडून द्यायचे होते. त्यापैकी 55 ग्रामपंचायतींत एक हजार 346 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे सहा हजार 799 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 17 हजार 386 नामांकन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 328 नामांकन अवैध निघाले. त्यानंतर वैध नामांकनाची संख्या 17 हजार 57 इतकी होती. अखेरच्या दिवशी 2 हजार 409 इच्छुकांनी नामांकन परत घेतले. त्यामुळे 14 हजार 510 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उभे आहेत.
प्रचारासाठी दहा दिवसाचा कालावधी -
निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी आठवडाभराचा कालावधी मिळत असल्याने गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापत आहे. ग्रामपंचायतींवर आपल्याच गटाची सत्ता यावी, यासाठी गावपुढार्यांकडून रणनीती आखली जात आहे. कालपर्यंत एकाच गटात असणारे दूर गेले तर, दुसर्या गटातील पुढारी विरोधी गटाला येऊन मिळाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायती -
यवतमाळ जिल्ह्यात 55 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात गावपुढार्यांना यश आले आहे. पालकमंत्री संजय राठोड व आमदारांनी केलेल्या घोषणेनुसार ग्रामपंचायतींना निधी मिळणार आहे. बाभूळगाव-5, दारव्हा-3, दिग्रस-2, घाटंजी-1, कळंब-3, केळापूर-6, महागाव-2, मारेगाव-1, महागाव-2, नेर-1, पुसद-6, राळेगाव-1, उमरेखड-10, वणी-8, यवतमाळ-1, झरी जामणी-5, याप्रमाणे बिनविरोध ग्रामपंचायती आहेत.