यवतमाळ- राळेगाव तालुक्यातील खडकी येथे सरकारची मान्यता नसताना शेतकरी संघटनेकडून 'बीजी 3' जातीच्या कापसाची लागवड केली असून सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
खडकी येथे शासनाच्या विरोधात 'बिजी 3' बियाण्याची शेतकरी संघटनेकडून लागवड
राळेगाव तालुक्यातील खडकी येथे सरकारची मान्यता नसतानाही शेतकरी संघटनेकडून 'बीजी 3' जातीच्या कापसाची लागवड केली असून सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाकडून बिजी 3 या कापसाच्या बियाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, हे बियाणे चांगले आहे, त्यामुळे यावरील बंदी हटवावी यासाठी शेतकरी संघटना अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज राळेगाव तालुक्यातील खडकी येथे राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात बिजी 3 कपाशी बियाण्याची लागवड करण्यात आली. त्यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. ही लागवड करण्यासाठी माजी आमदार वामनराव चटप व शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.