महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

testing - Partha Pratim ( do not remove) यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यातील टी-४ वाघिणीचा मृत्यू

वाघिणीच्या गळ्यामध्ये तार अडकल्याने तिची हालचाल फारच मंदावली होती. तिला बेशुद्ध करून उपचार करण्यासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला.

By

Published : Mar 19, 2019, 9:49 AM IST

Updated : Mar 19, 2019, 12:29 PM IST

मृत टी-४ वाघीण

testing Partha Pratim - do not remove

यवतमाळ - जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यामध्ये असलेल्या टी-४ वाघिणीच्या गळ्यात २ वर्षांपूर्वी तार अडकली होती. काल तिला बेशुद्ध करून उपचार करण्यासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती टिपेश्वर अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) प्र. बा. पंचभाई यांनी दिली.

टी-४ वाघिणीच्या गळ्यामध्ये ११ सप्टेंबर २०१७ ला तार अडकल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टी-४ वाघिणीला उपचार करण्यासाठी जेरबंद करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, या वाघिणीचे वास्तव्य अभयारण्य क्षेत्रातील पाणवठ्यावर फक्त रात्रीच्याच दरम्यान होत असल्याचे कॅमेऱ्यात ट्रॅप झाले होते. रात्रीच्या वेळेस तिला बेशुद्ध करणे शक्य होत नव्हते. ही वाघीण टिपेश्वर अभयारण्यात ५ मे २०१८ पर्यंत निदर्शनास आली होती. त्यानंतर ती अभयारण्य क्षेत्रात प्रत्यक्ष दिसली नाही किंवा कॅमेरामध्येही ट्रॅप झाली नव्हती.

१६ मार्च रोजी ही वाघीण अभयारण्यातील कक्ष क्रमांक १३३ मध्ये कॅमेरात ट्रॅप झाली. १७ मार्च रोजी क्षेत्रीय सनियंत्रण चमू वाघिणीच्या हालचालीच्या नियंत्रणाकरिता या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्याकरिता गेले असता, दुपारी साडेचारच्या सुमारास ही वाघीण नाल्यांमध्ये निदर्शनास आली. वाघिणीच्या गळ्यामध्ये तार अडकल्याने तिची हालचाल फारच मंदावली होती. तसेच तिला नीट उभे सुद्धा राहणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले.

टी-४ ला जेरबंद करून तिच्यावर उपचार करण्यासाठी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तिला बेशुद्ध करण्यात आले. बेशुद्ध झाल्यानंतर तिला तत्काळ उपचाराकरिता रेस्क्यू व्हॅनमधील पिंजऱ्यात टाकण्यात आले होते. दरम्यान ८ वाजताच्या सुमारास वाघीण मृत झाल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाघिणीचेमार्च १८ मार्च रोजी टिपेश्वर अभयारण्य शव विच्छेदन करण्यात आलेआहे. वाघिणीला जेरबंद करताना एक कर्मचारी जखमी झाला आहे.

Last Updated : Mar 19, 2019, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details