महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर सूरजला मिळाला न्याय; भांबोरा येथील मुख्याध्यापक निलंबित

या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ संबंधित ठाणेदार घाटंजी याना या प्रकरणात ज्युवेनाइल कायदा (बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियमानुसार घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

By

Published : Mar 17, 2019, 1:18 PM IST

उपोषणाला बसेलेले सुरज आणि त्याचे आईवडील

यवतमाळ - भांबोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता ४ थी इयत्तेमधील विद्यार्थी सुरज युवराज राठोड याला मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले यांनी बेदम मारहाण केली होती. यानंतर २५ फेब्रुवारीपासून सुरजच्या आईवडिलांनी सुरजसह आमरण उपोषणाला बसले होते. अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले याच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले.

उपोषणाला बसेलेले सुरज आणि त्याचे आईवडील

सुरजाला मारहाण झाल्यानंतर पालकांनी तक्रार देऊनही मुख्याध्यापकावर प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. आपल्याला न्याय मिळत नाही हे पाहून या मुलांच्या पालकांनी मनसेचे अनिल हमदापुरे यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली. या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ संबंधित ठाणेदार घाटंजी याना या प्रकरणात ज्युवेनाइल कायदा (बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियमानुसार घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, गुन्हा दाखल होऊनही शिक्षण विभाग त्या मुख्याध्यापकाला वाचविण्याचे प्रयत्न करत होते.

याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करण्यातचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले. परंतु, एवढे होऊनही प्राथमिक शिक्षण विभाग कुठलीच कारवाई करण्यास तयार नव्हता. मनसेने शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेताच यांनी या प्रकरणाची फाईल तयारी केली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश काढले. गेल्या १९ दिवसापासून सुरू असलेले उपोषण मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे आम्हाला न्याय मिळाला, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details