यवतमाळ - लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ज्वेलर्स व्यावसायिकाला महसूल आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने 50 हजार रुपयांचा ठोठावला आहे. महागाव तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असल्याने अनावश्यक दुकाने उघडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यावसायिकाला ५० हजाराचा दंड
फुलसावंगी येथील वर्मा ज्वेलर्स व्यावसायिकाने दुकाने उघडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित आदेशानुसार ज्वेलर्स व्यावसायिकावर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला. महागाव तालुक्यातील काही व्यावसायिक दुकाने उघडी ठेवत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस, आरोग्य आणि स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले. तालुक्यातील फुलसावंगी येथील वर्मा ज्वेलर्स व्यावसायिकाने दुकाने उघडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी ही कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित आदेशानुसार ज्वेलर्स व्यावसायिकावर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार डॉ. संतोष अदमुलवाड आणि फुलसावंगी ग्रामपंचायत पथकाने केली आहे.