महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावणेदोन लाखांची बोगस किटनाशके जप्त, कृषी केंद्र संचालकाला अटक

बोंडे कृषी केंद्रावर धाड टाकून पावणेदोन लाख रुपयांचे बनावट किटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

By

Published : Jan 5, 2021, 8:01 PM IST

Agriculture Center director arrested
कृषी केंद्र संचालकाला अटक

यवतमाळ : वणी येथील विवेकानंद कॉम्प्लेक्समधील बोंडे कृषी केंद्रावर धाड टाकून पावणेदोन लाख रुपयांचे बनावट किटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कृषी केंद्राचा संचालक सुनील बोढे याला विविध कलमान्वये अटक करण्यात आली.

नियमित तपासणीत आली होती शंका

जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे व त्यांच्या पथकांने 20 डिसेंबरला नगरपरिषद समोरील विवेकानंद कॉम्प्लेक्स मधील बोढे कृषी केंद्राची नियमित तपासणी केली. तपासणी दरम्यान कृषी अधिकाऱ्यांना दुकानात विक्रीसाठी उपलब्ध इमामेक्टीम बेंझोयट ५℅ ओक्लेम ब्रॅण्ड नावाची कीटकनाशक औषधी बनावट असल्याचा संशय आला. त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी सदर कीटकनाशकांचे १ किलोग्राम, ५०० ग्राम, २५० ग्रामचे १ लाख ८५ हजार किमतीची औषध जप्त केली. जप्त किटकानाशाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. लॅबच्या अहवालामध्ये कीटकनाशक औषधीमध्ये सक्रिय घटक अत्यल्प प्रमाणात असल्याचे नमूद करण्यात आले. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - सर्वसामान्यापर्यंत लस पोहोचण्यास लागतील किमान सहा महिने'

रात्री उशिरा टाकली धाड

राजेंद्र माळोदे यांनी ४ जानेवारी रोजी बोढे कृषी केंद्रचे संचालक सुनील बोढे यांच्या दुकानावर धाड टाकून पावणे दोन लाखांचे कीटक नाशके जप्त करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करुन बनावट औषध विक्री केल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल केली. आरोपी सुनील बोढे,( ३५, रा. रांगणा, ता. वणी) यास अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैभव जाधव करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details