यवतमाळ- मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आज यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात लाक्षणीक उपोषण करण्यात आलं. या उपोषणाला माजी राज्यमंत्री मदन येरावार यांची उपस्थित होती. यावेळी राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
'मदिरालये सुरू, मंदिरे बंद, उद्धवा अजब तुझे सरकार', भाजपचे मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी उपोषण
मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आज यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या उपोषणाला माजी राज्यमंत्री मदन येरावार यांची उपस्थित होती. यावेळी राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
साडेसहा महिन्यापासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावे याकरीता भाविकांनी अनेक वेळा मागणी केली आहे. राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उलट राज्यात मदिरालय उघडण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्या वेळाही वाढविण्यात आल्या. मात्र राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. असा आरोप यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला.
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने संपूर्ण अनलॉक केले. महाराष्ट्र सरकार हे कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. देशातील मोठ मोठे मंदिरे उघडण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने देवाला कोंडून ठेवले आहे. मदिरालये उघडणे हे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोना नियंत्रणाबाहेर जात आहे. हे सरकार तिघाडीचे आहे. त्यामुळे उद्धवा अजब तुझे सरकार अशी म्हणण्याची वेळ आता जनतेवर आली आहे. त्यामुळे तातडीने मंदिरे भाविकांसाठी उघडण्यात यावी, अशी मागणी उपस्थित भाजप कार्यकत्यांनी केली.