महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यमान आमदारांचे कारनामे उघड; काँग्रेसचे उमेदवार मांगुलकर यांचा आरोप

'संपूर्ण देशात भाजप सरकारने रस्त्याची कामे हाती घेतली आहे. त्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यातून भाजप नेते गब्बर बनले. ग्रामीण भागात प्रचारासाठी फिरत असताना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात महत्वाचे प्रश्न घेऊन जात आहोत.'

काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगरुळकर

By

Published : Oct 17, 2019, 10:12 AM IST

यवतमाळ - मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे तसतसा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उमेदवारांवर होत आहेत. "विरोधी उमेदवारांचा तोल सुटला आहे. विद्यमान आमदारांचे कारनामे उघडे पडले आहेत," असा आरोप काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगरुळकर यांनी केला. काँगेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगरुळकर

हेही वाचा-पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर

भ्रष्टाचार करुन भाजप नेते गब्बर बनले

'संपूर्ण देशात भाजप सरकारने रस्त्याची कामे हाती घेतली आहे. त्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यातून भाजप नेते गब्बर बनले. ग्रामीण भागात प्रचारासाठी फिरत असताना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात महत्वाचे प्रश्न घेऊन जात आहोत. विरोधी पक्षातील उमेदवाराचे कारनामे उघडे पडले आहेत. त्यामुळेच ते टीका टिप्पणी करीत आहे. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष करतो. कुणाकडून पैसे घेतले नाहीत. निश्वार्थ सेवा केली आहे. कोणताही घोटाळा केला नाही. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे,' असा विश्वास बाळासाहेब मांगरुळकर यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details