महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समुहामुळे अजगराला मिळाले जीवदान...

यवतमाळ शहरातील गणपती मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये अजगर आढळून आला. एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समुहामुळे या अजगरला जीवनदान मिळाले आहे.

जंगलामध्ये मुक्त करण्यात आलेला अजगर

By

Published : Jul 18, 2019, 2:56 PM IST

यवतमाळ - शहरातील गणपती मंदिराच्या मागे निलेश श्रीनिवास यांची बारदाना ठेवण्याची जागा आहे. या जागेत भारतीय जातीचा अजगर आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समूहाला हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून देण्यात आली. याची माहिती मिळताच एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या समुहाकडून अजगराला पकडून यवतमाळ शहराच्या बाहेर असलेल्या जंगलात सोडून देण्यात आले.

जंगलामध्ये मुक्त करण्यात आलेला अजगर
अजगर पकडल्याची माहिती या टीमच्या वतीने वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने या घटनेची नोंद करुन एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस या समुहाला काही निर्देश दिले. या निर्देशानुसार या अजगराला जंगलामध्ये मुक्त करण्यात आले. यावेळी एमएच 29 हेल्पिंग हॅन्डस समुहाचे सदस्य निलेश मेश्राम, साई सोनकर, अजय गुप्ता, प्रज्वल तुर्काने, सदु पाटील तसेच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details