यवतमाळ - पिंपळगाव येथील अंगणवाडी सेविका माया गजभिये यांनी पर्यवेक्षिकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून १ एप्रिलला आत्महत्या केली होती. मृत अंगणवाडी सेविकेला न्याय मिळून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियने (आयटक) जिल्हा परिषदेवर धडक देत पर्यवेक्षिका शोभा पटले यांना निलंबित करण्याची मागणी केली.
आत्महत्येस पर्यवेक्षिकाच कारणीभुत -
पिंपळगाव येथील अंगणवाडी सेविका माया गजभिये यांना पर्यवेक्षिका शोभा पटले यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येला पर्यवेक्षिका कारणीभूत असल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला. पर्यवेक्षिका पटले या पोषण आहार ॲप्समध्ये इंग्रजीत माहिती भरण्यासाठी व इतर कारणाने मानसिक त्रास देत होत्या, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला. ही पर्यवेक्षिका वादग्रस्त असून त्यांची अनेकदा बदली ही करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.