महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेत ठिय्या, भरवली 'सीईओ'च्या कार्यालयात शाळा

फुलसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कक्षातच शाळा भरवली.

By

Published : Aug 2, 2019, 6:30 PM IST

आंदोलन करताना विद्यार्थी

यवतमाळ -महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच शाळा भरवली. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करत असल्याची माहिती दिली.

फुलसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच शाळा भरवली.

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. एकीकडे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडील शाळेकडे असतानाही या शाळेमध्ये ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र, याठिकाणी शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने सत्राच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थी फक्त शाळेत येतात खिचडी खातात आणि घरी जातात हीच परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी यासंदर्भात गटविकास अधिकारी, शिक्षण विभाग यांच्याकडे निवेदनातून शिक्षकांची मागणी करण्यात आली. मात्र, याची दखल न घेतल्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कक्षासमोरच शाळा भरवली.

फुलसावंगी शाळेमध्ये २ शिक्षक असून इतर ३ शिक्षकाच्या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी मागणी केली. या मागणीची तसेच विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची दखल न घेतल्यास गावातील पालकांकडून यापेक्षाही तीव्र प्रकारचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details