यवतमाळ -वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून संचारबंदी सुरू आहे. यादरम्यान महसूल तसेच पोलीस विभागाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 226 कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत संचारबंदीचे कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. संचारबंदी लागल्यानंतर अवघ्या महिनाभरातच नगरपरिषद, महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भागात तब्बल 226 दंडात्मक कारवाया केल्या असून, यातून 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे.