यवतमाळ - जिल्ह्यातील रेती घाट बंद असल्याने रात्रीच्या सुमारास रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. दिग्रस तालुक्यातील शिवरवरून वाळूणे भरलेला ट्रक (एमएच 34 एम 2783) दिग्रसकडे येताना आर्णी-दिग्रस रस्त्यावरील लाख फाट्याजवळ सकाळी साडेपाचच्या सुमारास पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
अवैद्य रेती वाहतुकीचे तीन बळी; आर्णी-दिग्रस रस्त्यावरील लाख फाट्याजवळील घटना
चालक मनोहर तानाजी होलगरे यांना डुलकी लागल्याने साडेपाच वाजण्याच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाला. ट्रकातील रेतीवर कामगार झोपून होते. ट्रक पलटी झाल्याने वाळू खाली चार कामगार दबले गेले.
चालक मनोहर तानाजी होलगरे यांना डुलकी लागल्याने साडेपाच वाजण्याच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या खाली उतरूण पलटी झाला. ट्रकातील रेतीवर कामगार झोपून होते. ट्रक पलटी झाल्याने वाळू खाली चार कामगार दबले गेले. त्यातील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. गणेश नारायण होलगरे गंभीर अवस्थेत असून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची सुद्धा परिस्थिती चिंताजनक आहे. तर साहेबराव महादेव घोरपडे (26), अविनाश लहू कांबळे (26) आणि लखन पांडुरंग खटारे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.