यवतमाळ - येथील सिंगद येथे ज्वारीचे फुटवे खाल्याने सहा जनावरे दगावली आहेत. तर 35 जनावरांवर दवाखान्यात उपचार सुरु आहे.
ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने सहा जनावरे दगावली, यवतमाळ जिल्ह्यातील घटना
यवतमाळ येथील सिंगद येथे ज्वारीचे फुटवे खाल्याने सहा जनावरे दगावली आहेत. तर 35 जनावरांवर दवाखान्यात उपचार सुरु आहे.
जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे गावातील शेतकऱ्यांचे गुरे चारणारा गुराखी गुरे घेऊन चरविण्यासाठी गेला होता. गावालगत असलेल्या शेतात जनावरांनी ज्वारीचे फुटवे खाल्याने विषबाधा झाली. यामुळे ४ गाई व २ म्हशी जमिनीवर कोसळून दगावल्या. उर्वरित गुरांना विषबाधा झाल्याचे पाहून गुराखी घाबरून पळून गेला. ही बाब गावातील शेख अनवर यांना माहित होताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली. गावातील इतर शेतकऱ्यांना माहिती देऊन दिग्रस येथील पशु वैद्यकीय अधिकारी यांना माहिती देण्यात आली. संबंधित चमुने घटनास्थळी जाऊन ३५ जनावरांवर वेळेत उपचार केल्याने. इतर जनावरे वाचविण्यात त्यांना यश आले.