महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होम कॉरेंटाईन असलेले 49 जण परिघाबाहेर, गेल्या १४ दिवसांपासून होते बंदिस्त

यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी होम कॉरेंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 23 मार्चपर्यंत 154 वर पोहोचली आहे. 14 दिवसांपासून होम कॉरेंटाईन असलेल्या 49 नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे नसल्यामुळे ते नागरिक आता होम कॉरेंटाईनच्या परिघाबाहेर आले आहेत.

49 people with home quarantine free in Yawatmal
होम कॉरेंटाईन असलेले 49 जण परिघाबाहेर

By

Published : Mar 23, 2020, 7:21 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात विविध ठिकाणी होम कॉरेंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 23 मार्चपर्यंत 154 वर पोहोचली आहे. 14 दिवसांपासून होम कॉरेंटाईन असलेल्या 49 नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे नसल्यामुळे ते नागरिक आता होम कॉरेंटाईनच्या परिघाबाहेर आले आहेत. मात्र, पुढील १० दिवस ते आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली राहणार असून, त्यांनी स्वत:च काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह तसेच आरोग्य विभागाने केले आहे.

22 मार्च रोजी जिल्ह्यातील होम कॉरेंटाईन असलेल्यांची संख्या 150 होती. त्यात 23 मार्चपर्यंत ४ जणांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 154 वर पोहोचली. मात्र, गत 14 दिवस होम कॉरेंटाईन असलेल्या 49 नागरिकांना नियमीत आरोग्य तपासीणीअंती कोणतेही लक्षणे निदर्शनास आली नाहीत. हे सर्व 49 नागरिक आता या परिघाबाहेर आले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात होम कॉरेंटाईन असलेले 49 जण परिघाबाहेर

कोरोनाबाबत मोफत समुपदेशनकरीता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ८६०५४६८५७८ आणि ९४२३६२१९७६ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. दिवंगत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण ६ जण दाखल असून, यातील ३ जणांचे नमुने पॉझेटिव्ह आहेत. तर इतर ३ जण देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रक्रृती स्थीर असल्याचे वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details