यवतमाळ- बहुप्रतीक्षेत असलेली कोव्हिड-19 ची लस मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जिल्ह्याला मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही लस घेऊन आलेल्या वाहनांचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 18 हजार 500 लशींचा साठा प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील 5 केंद्रावरून आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी व अधिकारी अशा पाचशे जणांना लस देऊन शनिवारी ( 16 जानेवारी) लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.
18,500 कोव्हिड लशींचा साठा उपलब्ध हेही वाचा-लसीकरणाचा पहिला टप्पा तीस दिवसात करणार पूर्ण - मंत्री टोपे
आजच पाच केंद्रावर लशीचा पुरवठा
जिल्ह्यात कोव्हिशिल्डचा साठा जवळपास 20 तासांचा प्रवास करीत पुणे येथून अकोला मार्गे यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला आहे. हा लशीचा साठा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला हस्तांतरित करण्यात आला आहे. या ठिकाणावरून दारव्हा, पांढरकवडा आणि पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय आणि उमरखेड व वनी येथील ग्रामीण रुग्णालयाला या पाचही केंद्रांवर आजच लशींचा पुरवठा करण्यात आला.
लशींचा जिल्ह्यात आलेला साठा हेही वाचा-पुणे जिल्ह्यासाठी 'कोविशील्ड' लसीचे १ लाख ११ हजार डोस
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हिड-19 या लसीचे वाहन येताच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तुषार वारे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले की, मकर संक्रातीच्या दिवशी जिल्ह्याला असलेला 18,500 लशींचा कोटा पोहोचला आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीला पाच ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
राज्याला सिरमकडून 9 लाख 63 हजार लसी प्राप्त
दरम्यान, राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरू आहे. मंगळवारी (दि.१२ जाने.) सिरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार लसी प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली