महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 158 वर, ॲक्टिव्ह रुग्ण 33

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णाला कोव्हीड केअर सेंटर येथून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 33 झाली आहे.

Yavatmal Corona News
यवतमाळ कोरोना बातमी

By

Published : Jun 9, 2020, 9:09 PM IST

यवतमाळ - महागाव येथील कारोनाबाधित मृताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने भर पडली आहे. तर आज 1 जण कोरोनामुक्त झाला आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला कोविड केअर सेंटर येथून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 34 झाली होती. मात्र भरती असलेला एक जण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्हचा आकडा पुन्हा 33 झाला आहे.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 86 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझेटिव्ह तर उर्वरीत 85 निगेटिव्ह आहेत. मंगळवारी महाविद्यालयाने 113 नमुने तपासणीकरता पाठवले होते.

सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 2552 नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले असून यापैकी 2491 प्राप्त आहेत. 61 नमुन्यांचे रिपोर्ट अद्यापही अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 158 वर गेली आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून 2333 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details