वाशिम -जिल्ह्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी, पावसाच्या एंट्रीने जिल्हा सामान्य रुग्णालयाला मात्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चक्क रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३० मध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला आहे.
पावसाच्या पहिल्याच एंट्रीत जिल्हा सामान्य रुग्णालयाला तलावाचे स्वरूप; वार्डात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल
वाशिम जिल्ह्यात आज दमदार पाऊस पडला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३० मध्ये चक्क पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला आहे.
प्रथमच झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिमकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील वॉर्ड क्रमांक ३० मध्ये चक्क पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांचे हाल झाले आहेत.
रुग्णालयातील गळत्या स्वच्छतागृहकडे पावसाळ्यापूर्वी केलेल्या दुर्लक्षामुळे पाणी रुग्णालयाच्या वार्डात साचल्याचे बोलले जात आहे. यामुळे दाखल असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली आहे.