वाशिम -वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांची बदली झाली आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शनमुगराज एस यांची वाशिम जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. ऋषिकेश मोडक यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळत आहेत.
जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांची बदली, वाशिमकरांमध्ये नाराजी
वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांची बदली झाली आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शनमुगराज एस यांची वाशिम जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. ऋषिकेश मोडक यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 23 ऑक्टोबर रोजी आदेश काढले आहेत. वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून हृषीकेश मोडक यांनी सूत्रे स्वीकारताच त्यांना प्रशासनाला शिस्त लावण्यात यश मिळवले होते. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या शिस्तप्रिय नियोजनाने 2 महिने वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव टाळता आला.दरम्यान प्रशासकीय कारणाने मोडक यांची बदली झाली असून शनमुगराज एस यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजाविणारे हृषीकेश मोडक यांचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर बदली होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.