महाराष्ट्र

maharashtra

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हात मतदानाला उत्साहात सुरुवात

आज होणाऱ्या 152 ग्रामपंचायत मधील 539 केंद्रावर 1,233 जागांसाठी 2 लाख 88 हजार 691 मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. ही सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

By

Published : Jan 15, 2021, 11:14 AM IST

Published : Jan 15, 2021, 11:14 AM IST

Washim Gram Panchayat Polls
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हात मतदानाला उत्साहात सुरुवात

वाशिम : जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजेपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 163 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर, उर्वरित 152 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हात मतदानाला उत्साहात सुरुवात

पोलीस बंदोबस्त तैनात..

सकाळी गर्दी जरी कमी दिसून येत होती. मात्र हळूहळू गर्दी वाढत आहे. ही सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुमारे तीन लाख मतदार..

आज होणाऱ्या 152 ग्रामपंचायत मधील 539 केंद्रावर 1,233 जागांसाठी 2 लाख 88 हजार 691 मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. दरम्यान, रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी आपल्या परिवारासह मांगुळ झनक येथे मतदान केले. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करावे असे आवाहनही केले.

ABOUT THE AUTHOR

...view details