महाराष्ट्र

maharashtra

सोयाबीनला शेंगाचं नसल्याने शेतकऱ्याने 4 एकर सोयाबीनवर फिरवला रोटावेटर

सध्या सोयाबीन काढणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीनच्या अर्ध्याधिक शेंगा पोकळ असल्याने सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यंदा सोयाबीन सोंगणी आणि काढणीचा खर्च डोईजड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

By

Published : Oct 12, 2020, 7:52 AM IST

Published : Oct 12, 2020, 7:52 AM IST

Rotavator rotated on 4 acres of soybeans
4 एकर सोयाबीनवर फिरवला रोटावेटर

रिसोड- यावर्षी सोयाबीनचे बीयाणे बोगस निघाल्याने राज्याथ अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यंदाच्या हंगामात सध्या सोयाबीन काढणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीनच्या अर्ध्याधिक शेंगा पोकळ असल्याने सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यंदा सोयाबीन सोंगणी आणि काढणीचा खर्च डोईजड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, तालुक्यातील मांडवा येथील शेतकऱ्याने चार एकरातील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला.

4 एकर सोयाबीनवर फिरवला रोटावेटर
यंदा सोयाबीन पेरणीपासूनच या पिकाला निसर्गाची नजर लागली. सोयाबीनचे पीक चांगले येईल या आशेने जिवापाड मेहनत करून उसणवारी, उधारी करून सोयाबीनची मशागत केली. मात्र, दिवसेंदिवस हवामानात होत असलेल्या बदलामुळे यंदा वाशिम जिल्ह्यातील खरिपातील सोयाबीनचा हंगाम वाया गेला आहे. रिसोड तालुक्यातील मांडावा येथील भगवान राठोड यांच्या चार एकर शेतात सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याने पिकांची काढणी परवडत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या चार एकरात रोटावेटर फिरवून सोयाबीन पीक नष्ट केलं आहे.
सोयाबीनच्या शेंगामध्ये भरलेले दाणे ज्वारीच्या आकाराचे भरले आहेत. सद्यस्थितीत सोयाबीन सोंगणीला आले आहे. सोंगणी, काढणी आणि आतापर्यंत झालेला खर्च पाहता उत्पादनाच्या दृष्टीने लागलेला खर्च निघत नसल्याने या शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. कृषी विभागाने आता तरी पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details