वाशिम - टाळ-मृदंगांचा गजर, मुखात विठूनामाचा जयघोष अन् हातात भगवी पताका असे भजन करीत चाललेले बाल वारकरी अन् समवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेषातील विद्यार्थी-विद्यार्थिनी. असे भक्तिमय वातावरण आज वाशिम शहरात होते.
विठ्ठलनामाची ‘शाळा’ भरली, बाल वारकऱ्यांची शहरात दिंडी
आषाढी एकादशीनिमित्त सावित्रीबाई फुले शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीमधून विविध सामाजिक संदेश देऊन बालगोपाळांनी जनजागृतीही केली. दिंडीच्या निमित्ताने वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन असे सामाजिक संदेशही देण्यात आले.
विठ्ठलनामाची ‘शाळा’ भरली
आषाढी एकादशीनिमित्त सावित्रीबाई फुले शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीमधून विविध सामाजिक संदेश देऊन बालगोपाळांनी जनजागृतीही केली. दिंडीच्या निमित्ताने वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन असे सामाजिक संदेशही देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी पांढऱ्या शुभ्र पोशाखात मस्तकी टिळा, गळ्यात माळ अन टाळ घालून वारकरी बनले होते. या बाल वारकऱ्यांच्या दिंडी सह पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही दिंडी शाळेपासून ते बालाजी मंदिरापर्यंत काढण्यात आली.