महाराष्ट्र

maharashtra

सावित्रीबाई फुले जयंती : वाशिममध्ये महिलांनी काढली बाईक रॅली

चिमुकल्यांनी महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या साकारलेल्या वेषभूषा आकर्षित करत होत्या. त्यानंतर शहरातील महात्मा फुले चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

By

Published : Jan 4, 2020, 5:08 AM IST

Published : Jan 4, 2020, 5:08 AM IST

savitribai fule jayanti celebrated in washim
सावित्रीबाई फुले जयंती : वाशिममध्ये महिलांनी काढली मोटरसायकल रॅली

वाशिम - आद्य शिक्षिका तथा समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 वी जयंती शुक्रवारी साजरा करण्यात आली. यानिमित्ताने शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता. तसेच सामान्यज्ञान परिक्षा घेण्यात आली.

सावित्रीबाई फुले जयंती : वाशिममध्ये महिलांनी काढली मोटरसायकल रॅली

दरम्यान, चिमुकल्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साकारलेल्या वेषभूषा आकर्षित करत होत्या. शहरातील महात्मा फुले चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर बालू चौकातून शहराच्या प्रमुख मार्गाने निघून ही रॅली विठ्ठलवाडी मार्गे महात्मा फुले चौकात पोहोचली. या ठिकाणी ही रॅली पोहचल्यानंतर खिचडी वाटप करण्यात आले. यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

हेही वाचा -ठाण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सावित्रीबाईंचे मुखवटे लावून आंदोलन; 8 तारखेपासून देशव्यापी संप

ABOUT THE AUTHOR

...view details