वाशिम - जिल्ह्यातील पार्डी टकमोर येथील सीमा शिंदे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी वाशिम येथील मा गंगा मेमोरियल या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, योग्य उपचार न मिळाल्याने बाळाचा पोटात मृत्यू झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे आईचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
वाशिममध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकार्यांना निवेदन
अक्षम्य हलगर्जीपणाच सीमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, असा थेट आरोप मृत महिलेचा भाऊ संदीप वाणी, पती दत्ता शिंदे आणि गोपाळ समाज बांधवांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आज जिल्हाधिकार्यांना डॉक्टरांच्या दुर्लक्षाबद्दल निवेदन दिले आहे.
हेही वाचा-हार-जीतचा प्रश्न नाही, या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिमांमधील तणाव कमी होईल - इक्बाल अन्सारी
या प्रकरणाला आठ दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे राज्यातील गोपाळ समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अक्षम्य हलगर्जीपणाच सिमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, असा थेट आरोप मृत महिलेचा भाऊ संदीप वाणी, पती दत्ता शिंदे आणि गोपाळ समाज बांधवांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आज जिल्हाधिकार्यांना डॉक्टरांच्या दुर्लक्षाबद्दल निवेदन दिले आहे.