महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 19, 2019, 5:06 AM IST

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्यची ताकद साखर व्यवसायात - राजू शेट्टी

शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असल्याचे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले

वाशिम- शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असल्याचे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले

जिल्ह्यातील श्री बालाजी सहकारी साखर कारखाना गेली 19 वर्षे विरोधकांच्या राजकीय हस्तकांनी बंद पाडल्याची टीका त्यांनी केली. तसेच संबंधित कारखआना पुन्हा सुरू होण्यासाठी राजकारणापलिकडे दृष्टीकोन ठेवून प्रयत्न कऱण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. सध्या हा जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, केशवनगरच्या साखर कारखान्याचे रूपांतर मंदिरात नाही, तर थडग्यात झाले आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details