महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये सायकल रॅलीद्वारे मुलांनी साधली  निसर्गाशी जवळीक

'कावळा म्हणतो कावकाव, माणसा माणसा झाड लाव', या सारखे संदेश देत मुलांनी या सायकल रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीच्या माध्यमातून विज बचत, पेट्रोल बचत, झाडे लावा, पाणी बचत करा, असे संदेश देण्यात आले. या रॅलीत सहभागी मुलांनी आपल्या सायकलवर पर्यावरण जागृतीचे संदेश देणारे विविध फलक लावले होते.

वाशिममध्ये सायकल रॅलीद्वारे मुलांनी साधला पर्यावरणाशी संवाद

By

Published : Jun 8, 2019, 7:46 PM IST

वाशिम - दिवसेंदिवस पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होताना दिसत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी विविध संस्था, निसर्गप्रेमी व्यक्ती कार्य करत आहेत. यासाठीच कारंजा शहरात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी एक सायकल रॅली काढण्यात आली. मुलांमध्ये पर्यावरणाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने १५ किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवासात मुलांनी निसर्गाशी जवळीक साधली.

वाशिममध्ये सायकल रॅलीद्वारे मुलांनी साधला पर्यावरणाशी संवाद

'कावळा म्हणतो कावकाव, माणसा माणसा झाड लाव', या सारखे संदेश देत मुलांनी या सायकल रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीच्या माध्यमातून विज बचत, पेट्रोल बचत, झाडे लावा, पाणी बचत करा, असे संदेश देण्यात आले. या रॅलीत सहभागी मुलांनी आपल्या सायकलवर पर्यावरण जागृतीचे संदेश देणारे विविध फलक लावले होते.

पर्यावरणाची जाणीव जपत १५ किलोमीटरचा सायकल प्रवास मुलांनी गप्पा गोष्टी आनंदात पार केला. मुलांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण व्हावी व पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी म्हणुन पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली. धरण परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे करकोचे बगळे, टिटवी, कबूतर, मुनिया, सातभाई यासारखे पक्षी मुलांना पाहायला मिळाले. सायकल प्रवास, भोजन, गप्पागोष्टी अशी धमालमस्ती मुलांनी केली. एकीकडे पर्यावरणाची प्रचंड नासाडी होत असताना मुलांनी गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात काढलेली सायकल रॅली म्हणजे एक शुभ संकेत असेच मानावा लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details