वाशिम- राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. या परिस्थितीत अनेकांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. केंद्र शासनाच्यावतीने जनधन खात्यात विशिष्ट रक्कम देण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अनेक गरजू नागरिक या पैशांची अतुरतेने वाट पाहात आहेत.
जनधन खात्यातील पैशांसाठी वृद्ध दाम्पत्याचा ९ किमी सायकलवर प्रवास, पदरी निराशाच
केंद्र शासनाच्यावतीने जनधन खात्यात विशिष्ट रक्कम देण्यात येत आहे. आपले पण पैसे आले असतील या आशेने कारंजा तालुक्यातील वाघोळा येथील 70 वर्षाचे आजी आणि आजोबा पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचले. विशेष म्हणजे त्यांनी 9 किलोमीटरचे अंतर सायकलवर पार केले. मात्र, बँकेत पैसेच आले नसल्याने रिकाम्या हातीच त्यांना घरी परतावे लागले आहे
वृद्ध दाम्पत्याचा ९ किमी सायकलवर प्रवास
अशात आपले पण पैसे आले असतील या आशेने कारंजा तालुक्यातील वाघोळा येथील 70 वर्षाचे आजी आणि आजोबा पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचले. विशेष म्हणजे त्यांनी 9 किलोमीटरचे अंतर सायकलवर पार केले. मात्र, बँकेत पैसेच आले नसल्याने रिकाम्या हातीच त्यांना घरी परतावे लागले आहे. त्यामुळे, अशा ज्येष्ठ नागरिकांना गावातच बँकेने सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.