वाशिम - कोरोनाकाळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचार्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य करा. अन्यथा २५ जूनपासून बेमुदत संप पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे दिला आहे. यावर आज मंगळवारी सकाळी ८ ते १० या वेळात काम बंद केले होते. आणि २३ व २४ जूनला पूर्ण वेळ कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. असे वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर काम बंद आंदोलन दरम्यान परिचारिका यांनी सांगितले आहे. तरीही मागण्या मान्य न झाल्यास २५ जून पासून बेमुदत काम बंद केला जाईल. असा इशारा त्यांनी दिला आहे.
वाशिममध्ये परिचारिकांचे काम बंद आंदोलन २५ जूनपासून बेमुदत संपाचा दिला इशारा -
फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील सर्व परिचारिका कोविड रुग्णांना सातत्याने जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत. मागील वर्षी राज्यातील परिचारिकांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. मात्र अद्याप या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. परिचारिकांचे मनुष्यबळ अत्यंत अपुरे आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना परिचारिकांवर प्रचंड ताण पडतो. कोरोना काळात शासनाने परिचारिकांची साप्ताहिक सुटीही बंद केली. जीवाची बाजी लावून लढणाऱ्या अनेक परिचारिकांकडे शासन अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. मात्र आता मागण्या मान्य केल्या नाहीत तर २५ जूनपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - वाशिम येथील लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी