वाशिम - आरक्षणाच्या मागणीसाठीवाशिममध्ये आजवैदर्भीय नाथ जोगी समाज संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक्षा मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी नाथ जोगी समाजाच्या वतीने शासनाकडे इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
वाशिम : विविध मागण्यांसाठी वैदर्भीय नाथ जोगी समाजाचे 'भिक्षा मांगो' आंदोलन
आज वाशिममध्ये वैदर्भीय नाथ जोगी समाज संघातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक्षा मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी नाथ जोगी समाजाच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
नाथ जोगी समाजाचे भिक्षा मांगो आंदोलन
नाथ जोगी समाजाचा महाराष्ट्रात भटक्या जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समाजावर अन्याय होत आहे. नाथ जोगी समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करावे, आणि या प्रवर्गाला सरकारकडून मिळणारे सर्व लाभ नाथ जोगी समाजाला देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.