महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Washim Farmers issue : वाशिममध्ये गव्हाच्या तुलनेत हरभरा पेरणीकडेच शेतकऱ्यांचा कल; 'ही' आहेत कारणे

कृषी विभागाने ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाच्या पेरणी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यात २९ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा गहू पिकाचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, यंदा चित्र बदलले आहे.

हरभरा पेरणीकडेच शेतकऱ्यांचा कल
हरभरा पेरणीकडेच शेतकऱ्यांचा कल

By

Published : Dec 15, 2021, 4:56 PM IST

वाशिम -जिल्ह्यात यंदा कमी पाण्यात येणाऱ्या हरभरा पिकावर ( gram sowing crops in Washim )शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यंदा या पिकाचे क्षेत्र आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गव्हाऐवजी हरभरा पिकावर ( Wheat sowing crops in Washim ) का भर दिला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.

कृषी विभागाने ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाच्या पेरणी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यात २९ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ( gram sowing farm area in Washim ) हरभरा पिकाची शेतकऱ्यांनी केली आहे.

हरभरा पिकाच्या लागवडीला अधिक प्राधान्य

जिल्ह्यात मुबलक जलसाठा-
वाशिम जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने ठाण मांडल्याने पावसाची सरासरी १३१ टक्क्यांवर ( Water availability in Washim ) पोहोचली . या पावसामुळे सोयाबीन , कपाशी व तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. परंतु जिल्ह्यातील प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. विहिरी, कूपनलिका अगदी ओसंडून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात मुबलक जलसाठा असताना गहू पिकाला पाणी देणे शेतकऱ्यांना सहज शक्य होणार आहे.

हेही वाचा-State Government's Negligence In OBC Reservation :ओबीसी आरक्षण संदर्भामध्ये राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष.. अण्णा शेंडगे

विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त-

यंदा गहू पिकाचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होती. परंतु रब्बी हंगामात विजेची मागणी वाढते. त्यामुळे अधिक भार वाढून वीज रोहित्र निकामी होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यातून अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे महावितरणकडून भारनियमन केले जाते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे ( Washim farmers issue ) कठीण होते.

भारनियमनामुळे पिकाला आवश्यक प्रमाणात पाणी देणे शक्य होत नाही. यामुळे उत्पादन घटण्याची भीती असते. याच कारणामुळे शेतकरी गहू पिकाऐवजी हरभरा पिकाच्या पेरणीवर ( electricity issue impact on Washim farmers ) भर देत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अद्यापही काही भागात हरभरा पिकाची पेरणी सुरुच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हेही वाचा-Mumbai Schools Reopen - ओमायक्रॉनची भीती.. मुंबईत मुलांना शाळेत पाठवण्यास ३४ टक्के पालकांचीच परवानगी

शेतकरी गोपाल घुगे ( रा. शेलगाव) म्हणाले, की साडेसात एकरापैकी साडेपाच एकरावर हरभरा आहे. कमी पाण्यामुळे हरभरा येतो. भावही चांगला येतो. तसेच वीजेची समस्या असल्याने हरभरा पिकाची लागवड जास्त प्रमाणात केली आहे.

शेतकरी अन्नपूर्णा काळबांडे (रा. झाकलवाडी) म्हणाले, की वीजेच्या समस्येमुळे हरभरा पेरणीवर अधिक भर दिला आहे. पाणीही कमी लागते. तसेच हरभऱ्यालाही भावही चांगला मिळतो.

हेही वाचा-Kareena's Maid Tests COVID-19 Positive : करीनाच्या मोलकरणीला कोरोना, अभिनेत्रींच्या संपर्कातील 110 लोक निगेटिव्ह

वाशिम कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते ( Dr Bharat Gite on Gram Sowing ) म्हणाले, की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. दोन वर्षापूर्वी स्थितीही पावसाची चांगली होती. जिल्ह्यात गव्हाच्या पेरणीचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता होती. कारण, पाणीही मुबलक उपलब्ध आहे. मात्र, गव्हाला बाजारभावाप्रमाणे किंमत मिळत नाही. वीजेचे भारनियमन व रात्रीही वीज मिळत नाही. या कारणाने जिल्ह्यातील हरभरा पिकाच्या पेरणीचे प्रमाण वाढले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details