महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सततची नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च त्यामुळे पैशाची चिंता शेतकरी दिनकर घुले यांना सतावत होती. त्यामुळं त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत शेतकरी दिनकर घुले

By

Published : May 17, 2019, 7:57 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील चिखली (बु) येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिनकर घुले (वय - ५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

घुले यांच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यांच्यावर स्टेट बँकेचे एक लाख रूपयांचे कर्ज होते, असेही समजते. सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च यामुळे पैशाची चिंता घुले यांना सतावत होती. त्यामुळे त्यांनी कुटुंबात कुणी नसल्याचे पाहून आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

ABOUT THE AUTHOR

...view details