वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फळबाग उत्पादक शेतकरी ग्राहक मिळत नसल्याने संकटात आले आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारसमित्या बंद आहेत. सर्वत्र नाकाबंदी केल्याने वाहतूक देखील खोळंबली आहे.
वाशिममध्ये थेट ग्राहकांना द्राक्षविक्री; शेतकरी उतरला रस्त्यावर!
जालन्यातील दीपक चव्हाण या शेतकऱ्यांनी कृषी विभागाची परवानगी घेऊन वाशिम जिल्ह्यात थेट ग्राहकांना द्राक्ष विकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टस्टिंगचे पालन करून प्रत्येक ग्राहकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होत आहे.
मात्र, जालन्यातील दीपक चव्हाण या शेतकऱ्यांनी कृषी विभागाची परवानगी घेऊन वाशिम जिल्ह्यात थेट ग्राहकांना द्राक्ष विकण्यास सुरुवात केली आहे. 3 किलो द्राक्षाची पेटी 100 रुपयांत विकण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टस्टिंगचे पालन करून प्रत्येक ग्राहकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होत आहे.
बाजारपेठेत व्यपारी 10 ते 12 रुपये किलो प्रमाणे द्राक्षांची मागणी करत आहेत. मात्र त्यामध्ये उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र शासनाच्या कृषी विभागाने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीला परवानगी दिली आहे. यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. तसेच ग्राहकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे.