वाशिम - जिल्ह्यातील कामरगाव, धनज बु. सह परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बीतील गहू, हरभरा, तूर भाजीपाला पिकांचो मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Damage To Orchards Along With Crops In Washim District) त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. (Untimely Rain In Washim District) नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया देताना शेतकरी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान कामरगाव येथील प्रकाश गावंडे हे पारंपारिक पिकसोबतच भाजीपाला पीक घेतात. (Unseasonal Rains News )काल अचानक झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांनी आपल्याला मदत करावी अशी मागणी केली आहे
भाजीपाला पिकसोबतच तूर, गहू, हरभरा, संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याला मदत करावी अशी मागणी केली आहे.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान रब्बीतील पिकासह संत्रा बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान
अवकाळी पावसामुळे धनज परिसरात रब्बीतील पिकासह संत्रा बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजावर पुन्हा संकट आले आहे. जिल्ह्यात अनेक शेकडो हेक्टरवर परिमाण झाला. मात्र, प्रशासनाच्या वतीने अजून पंचनामे सुरूच केले नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा -ED Chargesheet On Anil Deshmukh : अनिल देशमुख प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल