वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील भूर गावात घरगुती सिलेंडरचा अचानक स्फोट झाला असून, यामध्ये २ घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, २ बैल होरपळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भूर गावात घरगुती सिलेंडरचा स्फोट; २ बैल होरपळले - वाशिम
वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील भूर गावात घरगुती सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये २ घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग विझवताना नागरिक
आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी पीडितांकडून करण्यात येत आहे.