वाशिम - कारंजा शहरात एका मोकाट गायीच नवजात वासरू ४५ फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली. त्यानंतर गाय विहिरीजवळ हंबरत बसली. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सर्वधर्म बचाव पथकाला याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पथकातील जवानांनी भेट देऊन त्या वासराला विहिरीतून बाहेर काढले.
वासरू विहिरीत पडल्याने गायीचा हंबरडा, बचाव पथकाने वासराला सुखरुप काढले बाहेर
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील एका विहिरीत गायीच वासरू पडले होते. त्याला सुखरुप बाहेर काढण्यात स्थानिक बचाव पथकाला यश आले आहे.
गाई आणि त्याचे वासरू
वासरू विहिरीत पडल्यामुळे गाय तिथेच हंबरत बसली. नागरिकांनी विहिरीत पाहिल्यानंतर त्यांना वासरू दिसले. त्यानंतर नागरिकांनी सर्वधर्म बचाव पथकाला याबाबतची माहिती दिली. घटनास्थळावर दाखल झालेल्या बचाव पथकाच्या विजय भिसे यांनी जीवाची पर्वा न करता वासरू सुखरूप विहिरीबाहेर काढले. वासरू बाहेर आल्यानंतर गायीने तत्काळ वासरासह घटनास्थळावरून निघून गेली.