वाशिम - प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली होती. त्यामुळे भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस विलास पवार यांनी प्रियांका गांधींविरुद्ध मंगरुळपीर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रियंका गांधींविरुद्ध भाजप कार्यकर्त्याची मंगरुळपीर पोलिसांत तक्रार
प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केल्यामुळे भाजप कार्यकर्ते विलास पवार यांनी प्रियांका गांधींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
भाजप कार्यकर्ते विलास पवार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना
प्रियांका गांधींनी मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केल्याने कोट्यवधी भाजप कार्यकत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही, तर मी न्यायालयात खटला दाखल करणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.